अमळनेरचा प्रभाग १३ पुन्हा बनणार का सत्ता केंद्र ?
पाश्चिमात्य देशात १३ हा आकडा अशुभ मानला जातो मात्र अमळनेर शहरातील प्रभाग १३ हा सातत्याने अमळनेर चे सत्ता केंद्र राहिला आहे. एक मंत्री ,चार आमदार ,एक खासदार आठ नगराध्यक्ष यांच्यासह बाजार समिती सभापती , पंचायत समिती सभापती याच प्रभागाने दिले आहेत. अमळनेरच्या विकासात अथवा भरभराटीत या प्रभागातील राहिवाश्यांचा मोठा वाटा आहे.
अमळनेर विधानसभा मतदार संघातील तीन प्रमुख स्पर्धकांपैकी मंत्री अनिल पाटील आणि खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉ अनिल शिंदे हे प्रभाग १३ मधील रहिवाशी आहेत. त्यामुळे पुन्हा प्रभाग १३ सत्ता केंद्र बनते का? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनिल पाटील हे जिल्हापरिषद सदस्य तथा बाजार समिती सभापती होते. माजी आमदार डॉ बी एस पाटील सतत १५ वर्षे आमदार असताना ते याच प्रभागात दत्त हाऊसिंग सोसायटीत राहत होते. माजी आमदार साहेबराव पाटील याच प्रभागातील रहिवाशी आहेत. विद्यमान खासदार स्मिता वाघ देखील याच प्रभागात राहतात. स्मिता वाघ या विधानपरिषद सदस्य तसेच माजी जिल्हापरिषद अध्यक्ष आहेत. याच प्रभागात माजी नगराध्यक्ष ,खान्देश शिक्षण मंडळाचे माजी चेअरमन , स्कूल बोर्डाचे माजी चेअरमन अर्बन बँकेचे माजी चेअरमन स्व सुरेश ललवाणी राहत होते.त्याच प्रमाणे खा शि मंडळ माजी चेअरमन , माजी नगराध्यक्ष विनोद पाटील , माजी नगराध्यक्ष देवाजी बुधा महाजन , माजी नगराध्यक्ष सुभाष भांडारकर , माजी नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल , माजी नगराध्यक्ष नाना रतन चौधरी , माजी नगराध्यक्ष पुष्पलता पाटील , माजी नगराध्यक्ष तथा माजी जिप सदस्य जयश्री पाटील यांनी देखील याच प्रभागातून सत्ता चालवली. सातत्याने नगराध्यक्ष विनोद पाटील व साहेबराव पाटील यांच्या काळात विकास कामात पाठपुरावा करणारे बाबू साळुंखे त्यांच्या आई चंद्रकला साळुंखे याच प्रभागातील आहेत. पंचायत समिती माजी सभापती श्याम अहिरे , पंचायत समिती माजी सभापती त्रिवेणीबाई पाटील हे देखील याच प्रभागातील रहिवासी आहेत. तसेच तत्कालीन प्रभारी पंचायत समिती सभापती असताना तिलोत्तमा पाटील याच प्रभागात राहत असत. यासह खान्देश शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अनिल कदम , शिक्षक प्रतिनिधी माजी नगरसेवक विनोद कदम , जितेंद्र देशमुख, वसुंधरा लांडगे ज्या अर्बन बँक संचालिका आहेत. तसेच अर्बन बँकेचे माजी चेअरमन भरत ललवाणी , माजी चेअरमन अभिषेक पाटील , तत्कालीन माजी नगरसेविका तथा अरबन बँक संचालिका मंगला भोसले, तसेच सध्या खा शि मंडळावर असलेल्या माधुरी पाटील देखील याच प्रभागात राहत होत्या. शेतकी संघ माजी अध्यक्ष संजय पुनाजी , माजी अध्यक्ष श्याम पवार , नूतन मराठा संस्थेचे माजी चेअरमन अशोक हिम्मत पाटील , माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे माजी अध्यक्ष लोटन चौधरी , माजी नगरसेवक सुभाष अग्रवाल , शेतकी संघाचे माजी अध्यक्ष डॉ नारायण पाटील याच प्रभागात राहतात. प्रा अशोक पवार , मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले याच प्रभागात राहत होते.
त्याच प्रमाणे या प्रभागात जी एस हायस्कूल , सानेगुरुजी शाळा , महिला महाविद्यालय , कन्या शाळा ,इंदिरा गांधी शाळा , एन टी मुंदडा , पी एन मुंदडा शाळा , विविध महत्वाचे दवाखाने , बसस्थानक ,चर्च , स्वामी समर्थ मंदिर, जिल्हा बँक , तापी महामंडळ कार्यालय ,कृषी कार्यालय , मराठा मंगल कार्यालय आणि मराठा समाजाचे अर्धे संचालक मंडळ आणि आता पंचायत समिती याच प्रभागात बांधली जात आहे.
प्रसिद्ध उद्योगपती तथा शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रकाश मुंदडा , प्रशांत निकम याच प्रभागातील रहिवासी आहेत.